25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमुंबई क्रिकेट निवडणुकीसाठी सोमवारी शरद पवार-आशीष शेलार पुन्हा भेट

मुंबई क्रिकेट निवडणुकीसाठी सोमवारी शरद पवार-आशीष शेलार पुन्हा भेट

एमसीए निवडणुकीसाठी चाचपणी सुरू

Google News Follow

Related

मुंबई क्रिकेट असोसिएशनला निवडणुकांचे वेध लागले आहेत पण सध्या प्रश्न आहे तो असोसिएशनच्या घटनेतील दुरुस्तीचा. सर्वोच्च न्यायालयाने खासदार, आमदारांनाही क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचे दरवाजे खुले केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष व एमसीएचे माजी अध्यक्ष आशीष शेलार एकमेकांची भेट घेणार असल्याचे कळते. सोमवारी ही भेट होईल, अशी शक्यता आहे. याआधीही शरद पवार आणि आशीष शेलार एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि त्याआधी भेटले होते. आशीष शेलार यांना महाडदळकर गटाचे आव्हान असेल. या गटातून माजी कसोटीपटू आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील हे इच्छुक आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासदार, आमदारांनाही निवडणुका लढवता येतील हे स्पष्ट केल्यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांचे मार्ग मोकळे झाले आहेत. त्या अनुषंगाने आशीष शेलार पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील मजबूत गट असलेल्या महाडदळकर गटातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उमेदवार असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीतील चित्र कसे असेल हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना लोढा समितीच्या शिफारशींनंतर एमसीएतून पायऊतार झाले होते. पण आशीष शेलार पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत, असे कळते. त्या अनुषंगाने शरद पवारांशी भेटून आगामी शक्याशक्यतांची पडताळणी करण्यासाठी ही भेट होत असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

‘उद्धव यांचे अस्तित्व संपले, आहे ते फक्त मातोश्रीपुरते’

केसरकरांच्या मनातूनही ठाकरे उतरले

‘भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊ नका’

पेट्रोलियम कंपनीची बोगस वेबसाईट बनवून घातला लाखोंचा गंडा

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक २७ सप्टेंबरला होणार होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींनाही निवडणुका लढविता येतील असे स्पष्ट केल्यामुळे एमसीएच्या घटनेत बदल करावे लागतील. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली जाणार आहे. पण ही घटनादुरुस्ती कधी होणार, त्यावर शिक्कामोर्तब कधी होणार आणि त्यानंतर निवडणुका कधी घेतल्या जाणार हा प्रश्न आहे.

महाडदळकर गटातर्फे त्यांची निवडणुकीच्या मैदानात उतरणारी संभाव्य टीम जाहीर करण्यात आली आहे.
त्यात संदीप पाटील, नवीन शेट्टी, जगदीश आचरेकर, गौरव पय्याडे, अजिंक्य नाईक हे पदाधिकारी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून संदीप विचारे, राजेंद्र तळपदे, डॉ. राजेश मढवी, राजेश महंत, दाऊद पटेल, सुरेंद्र हरमळकर, अभय हडप, कौशिक गोडबोले, प्रशांत सावंत, सुरेंद्र शेवाळे, विग्नेश कदम. सदस्यांसाठी ९ जागा आहेत पण यातून दोन नावे नंतर वगळण्यात येतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा