पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू झाला आहे. आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. यावेळी मिळालेल्या स्मृतिचिन्ह व भेटवस्तू इत्यादींचा ई-लिलाव संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या १२०० पेक्षा जास्त प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतिचिन्हांचा हा ई-लिलाव २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूंचा हा चौथा ई-लिलाव आयोजित केला आहे.
या सर्व भेटवस्तूची सर्वात कमी किंमत १०० ते ५ लाख रुपये आहे. मूळ किमतीनुसार सुमारे अडीच कोटी रुपयांच्या भेटी यावेळी लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतीय खेळाडू आणि राजकारण्यांच्या भेटवस्तू तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या लोकांच्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवसापासून हा लिलाव सुरू करण्यात आला आहे. पीएम मोदींना दरवर्षी मिळणाऱ्या भेटवस्तूंचा दरवर्षी लिलाव होतो. त्याच्याकडून जमा झालेली रक्कम विशिष्ट कामासाठी वापरली जाते. सांस्कृतिक मंत्रालयाने गेल्या वर्षी लिलावातून सुमारे १६ कोटी रुपये जमा केले होते. पंतप्रधानांना मिळालेल्या वस्तूंचा इ-लिलाव pmmementos.gov.in या वेबसाईट द्वारे केला जात आहे.
हे ही वाचा:
७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
मधुबनी पेटिंगपासून बुद्धिबळ संच
लिलाव होत असलेल्या या भेटवस्तूंमध्ये मधुबनी पेंटिंगपासून ते अलीकडेच झालेल्या चेन्नई बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सादर करण्यात आलेल्या बुद्धिबळ संचांचा समावेश आहे.
काय काय आहेत वस्तू ?
पंतप्रधान मोदींना मिळालेली नेत्रदीपक चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृती, पारंपारिक अंगवस्त्र, शाल, पगडी-टोप्या, अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती, पॅरालिम्पियन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंकडून मिळालेल्या भेटवस्तू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली राणी कमलापतीची भेट, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली हनुमान मूर्ती, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्याकडून मिळालेला त्रिशूळ याचाही समावेश यामध्ये आहे.