कोरोनाचा काळ संपल्यानंतर देशातील सर्व मंदिरे उघडण्यात आली होती. मात्र पालघरमधील पास्थल येथील विद्युत विभागाच्या वसाहतीत असलेले हनुमानजींचे मंदिर अद्यापही बंदच होते. त्यामुळे भाविकांची अडचण होत होती. मंदिर उघडण्याबाबत बजरंग दलाने प्रशासनाला इशाराही दिला होता.
मंदिर उघडण्यासाठी विहिंप-बजरंग दलाच्या अल्टिमेटमनंतर पोलीस दाखल झाले. पाेलिसांनी कारवाई करत हनुमान मंदिराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून पुन्हा तेथे पूजा सुरू केली. काेराेनानंतर तब्बल तीन वर्षांनी हे मंदिर उघडले गेले.
विद्युत विभागाच्या एका अधिकाऱ्याने कोरोनाच्या काळात हनुमान मंदिराच्या मुख्य गेटला कुलूप लावले होते, त्यामुळे तिथे पूजा अजूनही बंद होती, असा आराेप विहिप-बजरंग दलाने केला हाेता. याबाबत बजरंग दलाने २४ सप्टेंबरपर्यंत मंदिराचे कुलूप उघडण्याचा अल्टीमेटम प्रशासनाला दिला हाेता. असे न झाल्यास बजरंग दल मंदिरात जाऊन पूजा करून नंतर महाआरती करेल, असा इशाराही देण्यात आला हाेता.
हनुमान मंदिराचे कुलूप उघडल्यानंतर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले आणि मंदिराची साफसफाई करून तेथे पूजा सुरू केली. एका षड्यंत्राखाली मंदिर बंद करण्यात आल्याचा आराेप चंदन सिंह यांनी केला आहे.. धर्माच्या मार्गात कोणी अडथळा निर्माण केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
हे ही वाचा:
७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
हनुमान मंदिर उघडल्यानंतर तेथे पूजा सुरू करण्यात आल्याचे पास्थलचे एपीआय योगेश जाधव यांनी सांगितले. सध्या मंदिराचे उघडल्यानंतर झाल्यानंतर स्थानिकांनी आनंद व्यक्त केला असून लोक पूजेसाठी हनुमान मंदिरात पोहोचत आहेत.