25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवी भागात गणेश विसर्जनादरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक यांच्यात झालेल्या वादावादीनंतर काल मध्यरात्री मोठा राडा झाला. 

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसह उठाव केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवी भागात गणेश विसर्जनादरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक यांच्यात झालेल्या वादावादीनंतर काल मध्यरात्री मोठा राडा झाला.

दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले होते. शाब्दिक बाचाबाचीनंतर त्यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

गणेश विसर्जनादरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटाच शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. या प्रकरणानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. त्याशिवाय पोलिसांशीदेखील हुज्जत घातल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांनंतर दादर पोलिसांनी दोन्ही गटाच्या काहीजणांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि

विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

या राड्याप्रकरणी दादर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. त्यावेळी आमदार सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. तसेच सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बचावले असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला. तर, आमदार सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा