24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषविसर्जनानंतर एनसीसी करणार चाैपाट्या चकाचक

विसर्जनानंतर एनसीसी करणार चाैपाट्या चकाचक

क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी संचालनालय हे काम करणार

Google News Follow

Related

अकरा दिवसांच्या वास्तव्यानंतर मुंबई आणि उपनगरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जन हाेत आहे. सकाळपासूनच मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. संघ्याकाळी आणि रात्री उशीरापर्यंत बाप्पांना निराेप देण्यात येईल.

बाप्पांच्या विसर्जनासोबतच निर्माल्य मोठ्या प्रमाणात समुद्रात टाकण्यात येते. त्यामुळे समुद्र किनारे विद्रुप आणि प्रदूषित हाेतात. त्यामुळे विसर्जनानंतर शहरातील समुद्र किनाऱ्यांवर क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी संचालनालय महाराष्ट्राने गिरगाव चौपाटी स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी सकाळी ९ वाजता मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.

गिरगाव, जुहू, वर्सोवा आणि गोराई बीच हे मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. गणेशोत्सवादरम्यान या किनाऱ्यांवर समुद्रात बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. दुसऱ्या दिवशीही येथे मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि इतर कचरा जमा हाेत असताे. मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छतेच्या उपाययाेजना करण्यात येतातच . यासोबतच स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेऊन मुंबई महानगरपालिकेला साफसफाईसाठी मदत करत मुंबई शहरांसह उपनगरातील तलाव व समुद्रामध्ये गणरायांचे विसर्जन करण्यात येते, यामध्ये गिरगाव, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, मढ, अक्सा, मार्वे खाडीसह ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी, तसेच १६२ कृत्रिम ठिकाणी पालिके मार्फत विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ

अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना

याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

श्री गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन हे चौपाटीवरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४६० जाड लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ७८६ जीवरक्षकांसह ४५ मोटर बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी ३५७ निर्माल्य कलशांसह निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर या वाहनांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा