24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषप्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत माेहीम आजपासून सुरू

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत माेहीम आजपासून सुरू

राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू करणार माेहीमेचे अनावरण

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मार्च २०१८ मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेल्या क्षयराेग परिषदेत २०३०पर्यंत शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या पाच वर्षे आधीच देशातील क्षयरोग संपुष्टात आणण्याचे स्पष्ट आवाहन केले हाेते. त्याचाच एक भाग म्हणून २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेला पुनरुज्जीवित करण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा आरंभ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केला जाणार आहे.

समाजातील सर्वांना एकत्र आणून क्षयरोगावरील उपचारांसाठी मदत करणे आणि देशातील क्षयरोग निर्मूलनाला गती देणे ही प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची संकल्पना आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या नि-क्षय मित्र उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपती करतील. टीबी उपचार घेत असलेल्यांना विविध प्रकारचे साह्य करणाऱ्यांना (पोषण, अतिरिक्त निदान आणि व्यावसायिक मदत) नि-क्षय मित्र पोर्टल एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. रूग्णांना मदत करणाऱ्यांना नि-क्षय मित्र म्हटले जाते.

नि-क्षय मित्र  या पहिल्या उपक्रमात, १,००० पेक्षा जास्त भारतीयांनी भारतातील ७,००० क्षयरोग रूग्णांना दत्तक घेतले आहे. देशभरात सर्वाधिक दत्तक घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे.या उपक्रमाचे अनावरण राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्याहस्ते अधिकृतपणे हाेणार असले तरी नि-क्षय मित्राच्या पोर्टलवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून उत्सुक लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली होती.

हे ही वाचा:

आज होणार राजपथचे कर्तव्यपथ

निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

द इंडियन एक्स्प्रेसने गोळा केलेला माहितीनुसार २४ ऑगस्टपर्यंत, ११२५ व्यक्ती आणि एनजीओ, इतरांनी, ऑनलाइन नोंदणी केली आहे आणि भारतात ६९७५ टीबी रुग्णांना दत्तक घेतले आहे. त्यापैकी ३० टक्के दत्तक महाराष्ट्रात नोंदले गेले. पुण्याने सर्वाधिक क्षयराेग रुग्ण दत्तक घेतले असून, त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. त्या पाठाेपाठ उत्तर प्रदेशात ३३० लोकांनी २०६४ रुग्णांना दत्तक घेतले आहे. गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे जिथे १८५ लोकांनी १३५५ रुग्णांना दत्तक घेतले आहे, त्यानंतर राजस्थान आहे, जिथे १७९ लोकांनी ११४ रुग्णांना दत्तक घेतले आहे. हरियाणामध्ये २३ दत्तकांची नोंद झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा