प्रत्येक व्यक्तीने आपले आधार कार्ड बनवलेच पाहिजे हा संदेश लाेकांपर्यंत पाेहचवण्यासाठी एक अनाेखी कल्पना जमशेदपूरमधील एका गणेशाेत्सव मंडळाने केली आहे. या मंडळाने आधारकार्डाची अनाेखी सजावट केली असून त्यामध्ये गणपती बाप्पांना विराजमान केले आहे. ही सजावट गणेशभक्तांचं आकर्षण ठरले आहे. गंमत म्हणजे ही सजावट नुसतीच नाही तर या आधारकार्डावर गणपतीचा पत्ता आणि त्यांची जन्मतारीखही नमूद केली आहे.
जमशेदपूरच्या साकची मिल परिसरात गणेशोत्सवात एक अनोखा मंडप बांधण्यात आला असून त्यात गणेश विराजमान आहेत. दहा तरुणांच्या गटाने आर्थिक टंचाई लक्षात घेऊन या तरुण मंडळाने कमी खर्चात मांडव बांधला आहे. विशेष बाब म्हणजे पूजा समितीने फ्लॅक्समध्ये आधारकार्ड बनवले असून, त्यात नागरिकाचे नाव श्री गणेश असा लिहिले आहे.
आधारकार्डमधील फोटोच्या ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. आधार कार्ड ३५ फूट लांब आणि १५ फूट रुंद आहे. श्रीगणेशाचे आधारकार्ड असलेली ही सजावट पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक साकची येथे पोहोचत आहेत. हा अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी लोक त्यांच्या मोबाईलमधून सेल्फीही घेत आहेत.
कोरोनाच्या कालावधीनंतर बाजारात आर्थिक कोंडी झाली आहे. या काळात देणगी देऊन महागडा मांडव उभारणे अवघड होते. टीमने त्यांच्या खिशातील पैशातून आणि काही निवडक लोकांच्या मदतीने पूजा मंडप उभारला आहे. समाजाला संदेश देण्याचे काम करणारा असा पंडाल बनवला पाहिजे, असा त्यांच्या टीमचा विचार होता. यामुळेच त्यांनी श्रीगणेशाच्या आधारकार्डचे स्वरूप देऊन सजावट केली आहे, असे पूजा समितीने म्हटले आहे.
हे ही वाचा:
सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा
कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी
तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले
उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तुरुंगात भेटणार होते पण
स्कॅन केल्यावर मिळते गणपतीची माहिती
आधार कार्डमध्ये एक स्कॅनर आहे, जो मोबाईलवरून स्कॅन केल्यावर श्रीगणेशाच्या माहितीसह त्याची आकर्षक छायाचित्रेही पाहायला मिळत आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपले आधार कार्ड बनवलेच पाहिजे, असाच संदेश या प्रकारच्या मंडपामधून मिळत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.