25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारण'अल कायदाशी संबंधित एखादा पुजारी, साधू संत सापडला तर त्याच्यावरही कारवाई होईल'

‘अल कायदाशी संबंधित एखादा पुजारी, साधू संत सापडला तर त्याच्यावरही कारवाई होईल’

Google News Follow

Related

दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या मदरशांवर कठोर कारवाई करणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा सध्या चर्चेत आहेत. एबीपी न्यूजवर झालेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मदरशांवर जी कारवाई आसाममध्ये सुरू आहे ती त्या मदरशांचा संबंध अल कायदाशी आहे त्यांच्यावरच होते आहे. मुस्लिमांशी आपले काही वैर नाही. पण अल कायदाशी संबंधित एखादा पुजारी, साधू सापडला तर त्याच्यावरही कायद्यानुसार कारवाई होईल. तूर्तास तसे पुरावे कुठेही सापडलेले नाहीत.

विश्वशर्मा म्हणाले की, आसाम मध्ये हिंदुत्वापेक्षा मुस्लिमांच्या हिताच्याच बाबी मी पुढे आणतो. सगळ्यात जास्त मुस्लिमांच्या हिताच्या गोष्टी मी करतो. त्यावर मुलाखतकार रुबिना लियाकर यांनी विचारले की, पण मुस्लिम तुम्हाला घाबरतात, असे विरोधक म्हणतात. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही कोणत्या मुस्लिमांंबाबत बोलता आहात ते माहीत नाही. मदरसे बंद करा आणि डॉक्टर इंजीनियर बना असे जर मी म्हणतो तर ते मुस्लिमांच्या हिताचे नाही का? पण जर कुणी मुस्लिम म्हणत असेल की आपल्या मुलांनी केवळ इमाम बनावे, मुल्ला बनावे आणि त्यांनी डॉक्टर, वैज्ञानिक बनावे असे मी म्हणत असेन तर त्यात वाईट काय? त्यामुळे हिंदुत्वाचा चेहरा म्हणण्यापेक्षा मला तुम्ही मुस्लिमांचा पोस्टर बॉय म्हणा. कारण मी त्यांच्या हिताच्या गोष्टी करतो.

विरोधक म्हणतात की तुम्ही मदरसे तोडत आहात, यावर हिमंता विश्वशर्मा म्हणाले की, समाजात धार्मिक परंपरा रक्षण करण्यासाठी अनेक संस्था आहेत. पण एखाद्या संस्थेकडून या परंपरा जपण्यापेक्षा त्या संस्थेला अल कायदाचे ऑफिस बनवले जात असेल तर त्यांन मदरसा म्हणणार की अल कायदाचे कार्यालय म्हणणार? जे मदरसे तोडले जात आहेत, त्या मदरशातील मुलांचे अन्य शाळेत ऍडमिशन केले आहे. मी पालकांशी बोलतो की, मदरशांमध्ये मुलांना पाठवता ते शिक्षण घेण्यासाठी पण तिथे अल कायदासारख्या संस्थांशी संबंध ठेवले जातात. तेव्हा त्या पालकांना आम्ही विनंती करतो की, मुलांना शासकीय शाळांमध्ये पाठवावे. अल कायदाच्या कार्यालयाला कृपया मदरसा म्हणू नका, अशी आमची अपेक्षा आहे.

ओवेसींबद्दल विश्वशर्मा म्हणाले की, ओवेसीना मी सुधारणावादी मानत होतो, आता माझे विचार बदलले आहेत. जर त्यांना माझ्याबद्दल वेगळे वाटत असेल तर मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळे वाटू शकते. य़ाआधी अनेकवेळा टीव्हीवर काही मुस्लिम धर्मगुरू येत ते सेक्युलर आहेत, धर्मनिरपेक्ष भूमिका मांडतील असे वाटत असे पण तसे नव्हते. मग माझेही त्यांच्याबद्दलचे मत बदलत गेले.

हे ही वाचा:

इथून जातात मुंबईकरांचे मोबाईल फोन पाकिस्तानात

‘कर्तव्यपथ’वर चालले रजनीकांत

नितेश राणे यांच्या गाडीला अपघात पण कुणालाही इजा नाही

थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

 

ओवेसी हे मुस्लिमांना कट्टर बनवतात. मी लोकांकड़े वोट मागायला जात नाही. मी मुस्लिमांनाही सांगतो की, तुमचे मन साफ होत नाही माझ्याबद्दल आणि मी तुमच्यासाठीही काम करतोय असे तुम्हाला वाटत नाही, तोपर्यंत मला मत देऊ नका. मी १०-१५ वर्षे थांबायला तयार आहे, असेही विश्वशर्मा यांनी मुलाखतीत सांगितले.

मग कट्टरतावाद्यांसाठी तुम्ही अशी भूमिका मांडता मग पुजाऱ्यांसाठी तुम्ही अशी भूमिका का मांडत नाही, या प्रश्नावर विश्वशर्मा म्हणतात की, पुजारी जर अल कायदाशी लिंक असलेला सापडला तर त्याच्यासाठीही तोच कायदा असेल. भारतात असे अद्याप पुरावे सापडलेले नाहीत. पुजारी अल कायदाशी संबंधित आहे, भारतात जिहाद पुकारत आहेत असे दिसलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा