गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची चुरस सुरू होती. अखेर ब्रिटनला पंतप्रधान मिळाल्या असून लिज ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान असणार आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यात पंतप्रधानपदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. यात लिज ट्रस यांचा विजय झाला असून त्या लवकरच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला होता. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला होता. तर कोरोना काळात त्यांनी शासकीय निवासस्थानी पार्टी केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर ऋषी सुनक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिले होते. अखेर जॉन्सन यांनादेखील राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिज ट्रस हे या प्रक्रियेत पुढे होते. दरम्यान, लिज ट्रस यांनी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. ट्रस यांना ८१ हजार ३२६ मिळाली असून सुनक यांना ६० हजार ३९९ एवढी मतं मिळाली आहेत. या विजयासह थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ४७ वर्षीय लिज ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.
हे ही वाचा:
कल्याणमध्ये खड्ड्यामुळे एका महिलेला गमवावा लागला जीव
‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’
‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’
हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?
देशाच्या आर्थिक विकासाठी पुढील दोन वर्षात उत्तम कामगिरी करण्याचे प्रयत्न असतील. तसेच कर कमी करण्यासोबतच अर्थव्यवस्था वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ट्रस यांनी म्हटलं आहे. देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी धाडसी निर्णय घेणार आणि या कठीण काळात देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.