23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषगणरायाच्या विसर्जनासाठी तमाम यंत्रणांची जय्यत तयारी

गणरायाच्या विसर्जनासाठी तमाम यंत्रणांची जय्यत तयारी

गौरी गणपतींना सोमवारी निरोप

Google News Follow

Related

गणरायांच्या आगमनानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. बाप्पाच्या निरोप समारंभासाठी वाहतूक शाखेतील पोलीस यंत्रणेसह, प्रशासकीय व खाजगी यंत्रणा आता वाहतूक नियोजन करण्यात व्यस्त आहेत. सोमवारी गौरी-गणपती विसर्जनानंतर ६ सप्टेंबरला सात दिवसाच्या गणरायाचे विसर्जन असून, ९ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्थीला घरगुतीसह सार्वजनिक मंडळातील गणरायाचे विसर्जनाची वर्दळ सकाळी १० पासून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ पर्यंत चालू असते. या विसर्जन मार्गात कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून वाहतूक मार्गात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.

मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक मंडळातील गणपती असून, दीड लाखांच्या वर घरगुती गणपतीचे विसर्जन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीच्या दिवसापर्यंत करण्यात येते. हे विसर्जन मुंबई शहरांसह उपनगरातील तलाव व समुद्रामध्ये गणरायांचे विसर्जन करण्यात येते, यामध्ये गिरगाव, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, मढ, अक्सा, मार्वे खाडीसह ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी, तसेच १६२ कृत्रिम ठिकाणी पालिके मार्फत विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवसात मुंबई भागातील एकूण ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ५४ रस्त्यांवर वाहतूक एकेरी मार्गावर चालवण्यात येणार असून, ५७ रस्त्यांवर मालवाहू वाहनांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर ११४ ठिकाणी वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

बांगलादेशी जिहादी संघटनांची नजर झारखंडच्या मुलींवर?

बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात, रोहिंग्या हे बांगलादेशावरचे मोठे ओझे’

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गामध्ये कोणतेही अडचण निर्माण होऊ नये किंवा ट्रक, टेम्पो बंद पडून वाहतूक मार्गात कोणताही खोळंबा होऊ नये म्हणून, मुंबई महानगर पालिका यांच्याकडून लहान मोठ्या आकारांच्या क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सूचना देण्यात आले असून, नियमाचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहेत. तसेच गणेश विसर्जनासाठी मध्य रेल्वेवरील चार तर पश्चिम रेल्वेवरून जाणाऱ्या नऊ पूल अतिशय धोकादायक असून त्यातील काही पुलांचे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून, काही पूल पावसाळ्यानंतर पाडण्यात येणार आहेत. या पुलावरून नाच, गाणी न करता त्वरित पुढे जावे. असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा