देशाचे गृहमंत्री अमित शहा आज, ४ ऑगस्टला रात्री ९.३० ला मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात केले असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
आज रात्री साडे नऊ वाजता अमित शहा मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्काम करणार आहेत. मग सोमवारी सकाळी नऊ पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. उद्या अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास जाणार आहेत. त्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही घरी अमित शहा गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी शिंदे फडणवीस सरकार सद्यपरिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल.
हे ही वाचा:
Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू
बांगलादेशी जिहादी संघटनांची नजर झारखंडच्या मुलींवर?
बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात, रोहिंग्या हे बांगलादेशावरचे मोठे ओझे’
शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…
मुंबई पोलिस दलसह वाहतूक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी, राज्य राखीव दल, क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोध व निकामी पथक आणि रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) या विविध पोलीस दलांचा अमित शहा यांच्या दौऱ्यात समावेश आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच वेगवेगळ्या चौक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस दलाची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.