पाकिस्तानात पुराने गंभीर रूप धारण केले आहे. पुरामुळे पाकिस्तानात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो लोक बेघर झाली आहेत. तिथे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली असून, त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, मान्सूनच्या विक्रमी पावसामुळे आलेल्या पुरामुळे पाकिस्तानात १ हजार २०८ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये ४१६ मुले आणि २४४ महिलांचा समावेश आहे. तसेच पुरामुळे ६ हजार ८२ लोक जखमी झाले आहेत. या पुराचा फटका तीन कोटींहून अधिक लोकांना बसला आहे.
पाकिस्तानात तीन दशकांतील सर्वाधिक पाऊस यावेळी झाला आहे. हिमनद्या वितळल्यामुळे देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाकिस्तानचे सरकारदेखील यामुळे चिंतेत आहे.
पाकिस्तानातील २७ दशलक्ष लोकांकडे पुरापूर्वी पुरेसे अन्न नव्हते. आता उपासमारीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. युनायटेड किंगडमस्थित मदत युती आपत्ती आपत्कालीन समितीचे मुख्य कार्यकारी सालेह सईद यांनी मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली. पाणी सतत वाढत आहे. जास्तीत जास्त जीव वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असल्याचे सालेह सईद यांनी माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
‘भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत’
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव
महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार
मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा
दरम्यान, पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक धोकादायक परिस्थिती या पावसामळे निर्माण झाली आहे. देशातील ७५ टक्के लोकांना या पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे येथील लाखो एकर पिके उद्ध्वस्त झाली आहेत.त्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे.







