27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामादाऊदला पकडून देणाऱ्याला मिळणार २५ लाख

दाऊदला पकडून देणाऱ्याला मिळणार २५ लाख

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यांसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बक्षिसांची घोषणा केली आहे.

Google News Follow

Related

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यांसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बक्षिसांची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये १९९३ साली घडवून आणलेले साखळी बॉम्बस्फोट, शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद हा आरोपी आहे. तसेच दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप दाऊदवर आहे.

एनआयएकडून दाऊदला पकडू देणाऱ्या व्यक्तीला २५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. छोटा शकीलला पकडून देणाऱ्याला २० लाख तर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणाऱ्याला प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे.

दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराचीत वास्तव्यास आहे. १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदला पकडून देणाऱ्याला यापूर्वीच २५ मिलियन अमेरिकी डॉलर्स बक्षिस देण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून करण्यात आली आहे. भारतामधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीमध्येसुद्धा दाऊदचं नाव आहे.

हे ही वाचा:

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

एनआयएने दाऊद आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात फेब्रुवारी महिन्यात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. दाऊदच्या डी कंपनीने भारतामधील दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी विशेष तुकडी स्थापन केल्याची माहिती समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा