28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषमुंबईतील 'या' गणेशोत्सव मंडळाने काढला तीनशे कोटींचा विमा

मुंबईतील ‘या’ गणेशोत्सव मंडळाने काढला तीनशे कोटींचा विमा

Google News Follow

Related

महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच आता लागली आहे. याचवेळी मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाणारे जीएसबी सेवा मंडळ सध्या चर्चेत आहे. या मंडळाने आगामी गणपती उत्सवासाठी तब्ब्ल तीनशे कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.

मुंबईतील किंग्स सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने तब्बल ३१६.४ कोटींचा विमा उतरवला आहे. या मंडळाची मूर्ती सोन्याने मढवलेली असते त्यामुळे एकूण विम्यापैकी ३१.९७ कोटींची रक्कम बाप्पाच्या सोनं, चांदी आणि इतर दागिन्यांसाठी जोखीम विमा म्हणून ठेवली आहे. तसेच या मंडळात काम करणारे कार्यकर्ते, पुजारी, आचारी, व्हॅले पार्किंगसाठी नियुक्त कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांसाठी तब्बल २६३ कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. याशिवाय मंडळाने भाविकांचाही विचार केला आहे. मंडळातील मंडप, मैदान आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल २० कोटींचा विमा उतरवला गेला आहे.

जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामथ यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसांच्या उत्सवासाठी, सर्व सार्वजनिक दायित्वे आणि मंडळाला भेट देणाऱ्या भाविकांचाही विमा उतरवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही मंडळाने एवढ्या मोठ्या रकमेचा विमा घेतला नसल्याची माहिती कामथ यांनी दिली.

हे ही वाचा:

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी

दरम्यान, यावर्षी या मंडळाच्या गणपतीच्या मूर्तीवर ६६ किलो सोनं, २९५ किलो चांदीची आणि इतर मौल्यवान धातूंची दागिने असणार आहेत. यंदाची गणेशाची मूर्ती माती आणि गवताची असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा