25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषभारतीय सैनिकांनी रक्त देऊन वाचवले दहशतवाद्याचे प्राण

भारतीय सैनिकांनी रक्त देऊन वाचवले दहशतवाद्याचे प्राण

भारतीय सैन्यांनी जखमी अतिरेक्याला रक्त देवून प्राण वाचवले.

Google News Follow

Related

मानवतेचे उदाहरण म्हणून २१ ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेवर जखमी अवस्थेत जिवंत पकडलेल्या दहशतवादी तबराक हुसेनचे प्राण वाचवण्यासाठी राजौरी कॅम्पमधील भारतीय लष्कराच्या जवानांनी रक्तदान केले. पीओकेमधील सबाझकोट येथील रहिवासी तबराक हुसेन हा नौशेरा उपविभागातील सेहर माकरी गावात नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी करत असताना लष्कराच्या जवानांनी त्याचा घुसखोरीचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये तो जखमी झाला आणि जखमी अवस्थेत तो पकडला गेला.

तबरक हुसेन हा जखमी अवस्थेत जिवंत पकडला गेला आणि त्याला स्थानिक लष्करी छावणीत वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यानंतर लष्कराच्या जनरल हॉस्पिटल राजौरी येथे उपचारादरम्यान हलवण्यात आले, मागील काही दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. अशी माहिती लष्कराने दिली. आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव नायर यांनी सांगितले की, तबरक हुसेन नावाच्या रुग्णाला २१ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याच्या हाता-पायाला अनेक गोळ्या लागल्या होत्या. रुग्णालयात दाखल करताना त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता आणि त्याची प्रकृती गंभीर होती.

हे ही वाचा:

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

भारतीय सैनिकी डॉक्टरांनी ताबडतोब रूग्णावर मोठी शस्त्रक्रिया केली, डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांची एक संपूर्ण टीम रुग्णाची काळजी घेत आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. परंतु जखमांमुळे अजूनही त्याची प्रकृती गंभीर आहे, असे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. या दहशतवाद्याचे प्राण वाचवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी रक्तदान केले असून आतापर्यंत तीन युनिट रक्त रुग्णाला देण्यात आले आहे. मला बाकीच्या दहशतवाद्यांनी धोका दिला. त्यामुळे मी पकडला गेलो, माझे सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाले असून, पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहंमद या दहशतवाद्यांच्या अनेक शिबिरात मी गेलेलो आहे. अशी माहिती जखमी अतिरेक्याकडून मिळाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा