शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत आर्थिक व्यवहार असलेले त्यांचे मित्र सुजीत पाटकर यांच्या कलिन्यातील सुमीत आर्टीस्टीका फ्लॅटवर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ED ची धाड पडली. या धाडीत अनेक महत्वाची कागदपत्र ED च्या हाती लागली. त्यानंतर १७ फेब्रुवारीला पाटकर यांनी दोन दिवसात आपण संजय राऊत यांच्याशी आपले कसलेच आर्थिक संबंध नाही, याचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परीषद घेणार असे जाहीर केले होते. ती पत्रकार परीषद तर आजतागायत झाली नाही. परंतु पाटकर यांच्यावर काल आझाद मैदान पोलिस ठाण्यात कोविड सेंटर फसवणूक प्रकरणात गुन्हा मात्र दाखल झाला आहे. यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणी मात्र नक्कीच वाढणार आहेत.