28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरअर्थजगतअनिल अंबानी यांनी ८१४ कोटी रुपये लपवले

अनिल अंबानी यांनी ८१४ कोटी रुपये लपवले

अनिल अंबानींना आयकर विभागाची नोटीस

Google News Follow

Related

उद्योगपती अनिल अंबानी यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल ८१४ कोटी रुपयांची माहिती अनिल अंबानी यांनी लपवून ठेवल्याचा आरोप अनिल अंबानी यांच्यावर करण्यात आला आहे. या रकमेवरील कर चुकवल्याचा आरोप अनिल अंबानी यांच्यावर करण्यात आला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांनी दोन परदेशी बँकांमध्ये जवळपास ८१४ कोटी रुपये ठेवले असून त्याची माहिती लपवली असल्याचा आरोप आयकर विभागाकडून करण्यात आला आहे. या संबंधीची नोटीस आयकर विभागाकडून जारी करण्यात आली आहे. या नंतर अनिल अंबानी यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा:

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

अनिल अंबानी यांना ३१ ऑगस्टपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनिल अंबानी यांनी जाणिवपूर्वक कर चुकवण्यासाठी परदेश बँकेतील खाती आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवली, असा आरोप आयकर विभागाकडून करण्यात आला आहे. बहामास येथील इकाई डायमंड ट्रस्ट आणि अन्य एका नॉर्दर्न एटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड या कंपनीसोबत अनिल अंबानी जोडलेले आहेत. या कंपनीसोबत आलेली मिळकत आणि मालमत्ता ही अनिल अंबनींची असल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणात अनिल अंबानी दोषी आढळल्यास २०१५ मधील काळा पैशांविरोधातील कलम ५० आणि ५१ अन्वये त्यांना दंडासह १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा