23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषनाशिकमधल्या दाम्पत्याने तयार केला इलेक्ट्रिक बैल

नाशिकमधल्या दाम्पत्याने तयार केला इलेक्ट्रिक बैल

इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत आता शेतीसाठी अद्ययावत इलेक्ट्रिक बैलांची निर्मिती..

Google News Follow

Related

भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो. देशात नवनव्या क्रांतिसह शेती उद्योगातील यंत्रणेत बदल होत आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्याला दिवसेंदिवस वाढत चालेल्या महागाईमुळे इंधनाचे दर परवडणारे नाहीत. इंधनामुळे प्रदुषणाच्या समस्या आणखी वाढत चालल्या आहेत. तसेच दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतातील बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये इव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेहिकलच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते, याच आधारावर आता इलेक्ट्रिक वाहनापुरता मर्यादित न राहता शेतीसाठीही त्याचा उपयोग होत आहे.

तसेच शेतकऱ्यांना आजही बैलजोडी किंवा ट्रॅक्टर घेऊन सांभाळ करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना भेडसावत असणाऱ्या समस्या अद्ययावत पद्धतीने सोडवण्यासाठी नाशिकमधल्या तुकाराम सोनावणे आणि सोनाली वेलजाळी या इंजिनीयर दाम्पत्याने कृषिगती प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत २०२१ मध्ये स्टार्टअप ला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी शेतीसाठी इलेक्ट्रिक बैल यंत्रणेची निर्मिती केली. सहजपणे हाताळणारे यंत्र असून एकदा चार्ज केल्यावर शेतात ४ ते ५ तास काम करू शकणारे. तसेच हलकी पूर्वमशागत, पेरणी व अंतर्गत माशागतीसाठी हे यंत्र उपयुक्त असून प्रदूषण शून्य व यातून अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होत नाही.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सुभाष चव्हाण, यांनी उपकरणाच्या चाचण्या घेतल्या आहेत, ते म्हणतात, शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन प्रचंड उपयुक्त आहे. चव्हाण यांनी सोयाबीन पिकासाठी चाचण्या घेतल्या आणि काही तासांत त्यांचे काम पूर्ण झाले. मशीन नसती तर याच कामाला तीन दिवस लागले असते आणि सुमारे १२ मजुरांच्या मदतीने हे पार पाडले असते. या संपूर्ण शेतकामासाठी चव्हाण यांना सुमारे ५ हजार रुपये खर्च आला असता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा