महाराष्ट्रात महाबळेश्वरच्या धर्तीवर काही नवी हिल स्टेशन निर्माण करण्याची घोषणा करत केवळ शेतकरी आणि आदीवासींची जमीन लाटण्यात आली नाही तर मध्यमवर्गीयांचे हजारो कोटी रुपये बुडवण्याचे पाप पवार कुटुंबियांच्या नावावर आहे. काल शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परीषद घेऊन तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांची जोरदार पाठराखण केली. परंतु आता सुप्रीम कोर्टाने लवासाची केलेली पाठराखण पाहाता पवारांनी सध्या सुप्रिया सुळे यांची काळजी घेण्याची गरज आहे.