लहरी राजा आणि उपाशी प्रजा अशी परीस्थिती महाविकास आघाडी सरकारच्या काळात होती. पर्यावरणाच्या नावाखाली जनतेचा कडेलोट करणारे अनेक निर्णय घेण्यात आले, परंतु या निर्णयामागे वरकरणी बालहट्ट आणि लहरीपणा दिसत असला तरी मुळ हेतू महापालिकेची तिजोरी साफ करण्याचा होता. पर्यावरणाच्या नावाखाली रद्द केलेल्या गारगाई धरणाच्या प्रकल्पाचा विचार केला तर जसा मेधा पाटकर यांनी गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पात खोडा घातला, तशाच भूमिकेत महाराष्ट्रात आदीत्य ठाकरे होते.