लोकसभेचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबई येथे सापडला आहे. मुंबईतील मारिन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेल मध्ये डेलकर यांचा मृतदेह सापडला आहे. मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते.
सोमवार दि.२२ फेरब्रुवारी रोजी दुपारी मुंबईतील एका हॉटेल मध्ये खासदार मोहन डेलकर मृतावस्थेत सापडले. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. डेलकर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांना गळफास घेतलेला डेलकरांचा मृतदेह आढळून आला. मोहन डेलकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाला नंतरच डेलकर यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल.
हे ही वाचा:
कोण होते खासदार मोहन डेलकर?
खासदार मोहन डेलकर हे दादर आणि नगर हवेलीचे खासदार होते. त्यांनी कामगार संघटनेचे नेते म्हणून आपल्या कार्याला सिल्वासा येथून सुरवात केली. १९८९ साली ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. आजवर डेलकर सात वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, भारतीय नवशक्ती पार्टी, अशा विविध पक्षांचे सदस्य राहिले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष खासदार म्हणून निवडून गेले होते. नंतर त्यांनी नितीश कुमार यांच्या ‘संयुक्त जनता दल’ पक्षात प्रवेश केला.