24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषदेवगडला मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करा

देवगडला मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करा

भाजपा आमदार नितेश राणे यांची मागणी

Google News Follow

Related

देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. पत्राद्वारे नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी पत्रात, कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी लगतच्या ८७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी हा तेथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यामध्ये एकूण मच्छीमारांची लोकसंख्या ३२ हजार १७ आहे. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले याठिकाणी बंदरे व मच्छीची उतरणावळ करणारे ३४ धक्के आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १ हजार ८२१ यांत्रिकी व १ हजार ४२९ बिगर यांत्रिकी व छोट्या होड्यांद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते.

जिल्ह्यामध्ये अनेक कोल्डस्टोरेजेस असून त्याद्वारे मच्छीवर प्रक्रीया केली जाते. असे असूनही जिल्हयामध्ये मत्स्य महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्य व्यवसाय शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी जिल्ह्यातील जनतेची बरेच वर्षांची मागणी आहे. सदरहू ठिकाणी मत्स्य व्यवसाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक असे योग्य, खारे, निमखारे व गोड्या पाण्याचे स्त्रोत्र उपलब्ध आहेत.

हे ही वाचा:

मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

देवगड येथे महाविद्यालय सुरू झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूणांना नोकरी व व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट यासारख्या पदव्या प्राप्त करणे सोईचे होईल, जेणेकरून जास्तीत जास्त तरूण हे शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर कार्यरत होतील तसेच स्वतःचे उद्योग सुरू करतील. तरी जनतेच्या मागणीनुसार देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या बऱ्याच यांच्या मागणीला त्वरीत मंजूरी द्यावी, अशी विनंती नितेश राणे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा