24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणसक्षम नसतो तर मी एवढा मोठा 'कार्यक्रम' केला असता का

सक्षम नसतो तर मी एवढा मोठा ‘कार्यक्रम’ केला असता का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिल्या कानपिचक्या

Google News Follow

Related

मिश्किल बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना चोख उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार चालवत आहेत, अशा टीका विरोधकांकडून वारंवार केल्या जात असतात त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सक्षम नसतो तर मी एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही. जयंतराव भेटले मला आणि म्हणाले की असं कसं झालं.

मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षाच्या निवडीबाबतही सविस्तर भूमिका मांडली. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, १९७४ साली थेट जनतेच्या निवडीतून नगराध्यक्ष प्रस्ताव स्वीकारला गेला. १९८५ला बदलेला गेला.तेव्हा आपलं सरकार होतं, असं शिंदे यांनी अजित पवारांकडे पाहात म्हटले. २००६मध्ये नगराध्यक्ष करावा असा निर्णय घेतला गेला. असे निर्णय आताच बदललेले नाहीत. नगरविकास मंत्र्याचा निर्णय म्हणजे सरकारचा निर्णय. अनेक निर्णय घेतले नंतर बदलले. महाविकास आघाडीनेही निर्णय घेतले व बदलले.

शिंदे म्हणाले की, अंबरनाथचं उदाहरण देईन सुनील चौधरी नगराध्यक्ष झाला. थेट नगराध्यक्ष झाले त्यांनी काम केले आहे. ते निर्णय घ्यायचे. नगराध्यक्षाला अधिकार दिला पाहिजे त्याबद्दल विचार करता येईल. लोकाभिमुख काम करायचे आहे तर लोकांमधून येणारा चांगले काम करू शकतो. जो नगराध्यक्ष चुकीचा निर्णय घेईल त्याच्यावर कारवाई होईल. विधि न्याय विभागाची मान्यता आहे. त्यामुळे विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. कोण बंदूक ठेवून निर्णय घेतला म्हणत आहेत.

हे ही वाचा:

चोरट्यांनी चोरल्या ४५० वर्षे जुन्या मूर्ती

शिवाजी पार्कवरील कोट्यवधीच्या मातीचे ढिगारे कुणी खाल्ले

सुसज्ज, सुसाट ‘ वंदे भारत

भाजपच्या बड्या नेत्यावरील हल्ल्याच्या तयारीतला दहशतवादी रशियात पकडला

 

मै और देवेंद्र है साथ साथ. मेरा नाम है एकनाथ

नगराध्यक्षाचा निर्णय घेतल्यावर ग्रामपंचायतींचे सरपंच थेट होतील, असे म्हटले गेले. ९ हजार ग्रामपंचायतींनीच तशी मागणी केली आहे. थेट सरपंच निवडावा ही त्यांची मागणी आहे. ही महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली आहे. जनतेची मागणी आहे. जनता बोलेल तेच आम्ही करणार. एकनाथराव स्वतःच्या विचारांनी चाला वगैरे भास्करराव (जाधव) बोलत होते. पण त्यांनी चिंता करू नये. मै और देवेंद्र है साथ साथ. मेरा नाम है एकनाथ

फडणवीसांनी दाखविली प्रेम, दया, करुणा

विधिमंडळाच्या बाहेर विरोधक दोनच शब्द बोलत होते. त्यात मुंडेही होते. ते किती वर्षे शिवसैनिक आहेत, अशा थाटात बोलत होते. घसा खराब होईपर्यंत बोलले. तुमचाही प्रवास मला माहीत आहे. देवेंद्रजींनी तुम्हाला प्रेम, दया, करुणा दाखविली. आम्ही कोणत्याही निर्णयांना उगाच स्थगिती दिलेली नाही. पण आम्ही गुवाहाटीला असताना पत्र दिलं आणि सरकार अल्पमतात आलं. तरीही फटाफट ४०० जीआर काढले. मग कसे थांबवणार नाही आम्ही ते निर्णय. जनतेच्या हिताची कामे आहेत त्यावर स्थगिती नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा