भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे. ३९ वर्षीय झुलनची क्रिकेट विश्वात सुमारे १९ वर्षाची कारकीर्द झाली असून, या कालावधीमध्ये तिने भारतीय संघासाठी आतापर्यंत १२ कसोटी, २०१ वनडे आणि ६८ टी- २० सामने खेळले आहेत. वन- डे क्रिकेटमध्ये २०० हून अधिक बळी घेणारी झुलन ही जगातील एकमेव महिला खेळाडू आहे. तसेच मिताली राज नंतर सर्वाधिक २०१ वन-डे सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते.
गेल्या काही मालिकांमध्ये झुलनचा समावेश नव्हता. नुकतीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघांची निवड करण्यात आली आहे. वनडे मालिकेतील तिसरा सामना आणि अखेरचा सामना २४ सप्टेंबर रोजी लॉर्ड्सवर होणार आहे. तिला निवृत्तीसाठी अखेरची संधी इंग्लंडच्या दौऱ्यातून देण्यात आली आहे. झुलनने या वर्षी २२ मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. एकदिवसीय विश्वचषकाअंतर्गत न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथे हा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघ ११० धावांनी विजयी झाला. ज्यात झुलन गोस्वामीने १९ धावांत २ बळी घेतले. यानंतर जुलैमध्ये श्रीलंका मालिकेसाठी झुलनची निवड झाली नाही.
हे ही वाचा:
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी
बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून झुलन निवृत्त होत असली तरी, मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये तिला खेळण्यासाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. खेळाडू म्हणून संधी मिळाली नाही तर, एखाद्या संघाचे मेंटॉर किंवा प्रशिक्षक होण्याचा तिचा विचार आहे.