27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणमुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा

मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला

Google News Follow

Related

हा तारीख पे तारीख वाला खटला नाही. मुंबईच्या समस्यांचा खरा आरोपी कोण हे मुंबईकरांसमोर मांडायचे. तेच न्याय करतील. मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. मुंबईच्या समस्यांचे आरोपी कोण हे जनतेला विचारायचं आणि जनतेला सांगायचं. न्यायाधीश तुम्ही आरोपी हे. आता न्याय मुंबईकरता करा. बाळासाहेबांचे नाव घेऊन भाजपवर सत्ता गाजवणाऱ्यांनी मुंबईकडे कधी लक्ष दिले नाही. मुंबई म्हणजे त्यांच्यासाठी केवळ मलई होती. मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा आहे. मुंबईला बदल हवाय. येत्या निवडणुकीत भाजप अशा लोकांना जागा दाखवून देईल असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मुंबईत वडाळा येथील षण्मुखानंद सभागृहात भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला करताना फडणवीस म्हणाले, शिवसेनेनं बाळासाहेबांचं स्वप्न धुळीस मिळवलं. मराठी माणसांबाबत त्यांची मुंबईत जी स्वप्न होती ती शिवसेनेने धुळीस मिळवली पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भाजपकडे आहे असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठी माणूस शिवसेनेमुळे बाहेर गेला. भाजपमध्ये क्षेत्रीय अस्मितेला वेगळं महत्व आहे. काही पक्ष केवळ मराठी माणसाच्या नावावर राजकारण करतात. शिवसेनेनं मराठी माणसासाठी काहीही केलं नाही. मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईत राहणाऱ्या अमराठी व्यक्तीला देखील मराठी अभिव्यक्तीचा अभिमान आहे असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास

आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी बसून मंत्रालय चालवण्याच्या कार्यपद्धतीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मुख्यमंत्री तुम्हाला घरी बसणार नाहीत घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही. काल दहीहंडीला मुंबईत तोच उत्साह, तोच जल्लोष, ती संस्कृती दिसली. आपलं सरकार आल्यावर काय घडतं हे सर्वांनी पाहिलं. आता गणपती, नवरात्र सण ही जोरात साजरे करायचे आहेत. असं सांगून फडणवीस यांनी मविआ सरकारच्या काळात सणांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला.

सामना शेलार जिंकणार

मागील मुंबई महापालिका निवडणुकीत आमची तयारी झालेली असताना मित्र पक्षासाठी दोन पावलं मागे गेलो .त्यांना महापौर बनवू दिला. आाता शिवसेना भाजप युतीचा महापौर असेल मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही., शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा सामना शेलार जिंकणार असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा