25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणकाँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली महात्मा गांधींच्या फोटोची तोडफोड?

काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली महात्मा गांधींच्या फोटोची तोडफोड?

चार काँग्रेस कार्यकर्त्यांनाअटक

Google News Follow

Related

खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयात महात्मा गांधींच्या प्रतिमेची तोडफोड केल्याप्रकरणी खासदार राहुल गांधी यांच्या स्वत:च्या कर्मचार्‍यांसह चार काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या वर्षी २४ जून रोजी वायनाडच्या कार्यालयाची तोडफोड एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या प्रकारानंतर काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत.

कालपेट्टा पोलिसांनी शुक्रवारी राहुल गांधींचे पीए रतीश कुमार, कार्यालयातील कर्मचारी राहुल आणि काँग्रेस नेते नौशाद आणि मुजीब यांना अटक केली. वृत्तानुसार, काँग्रेस कार्यकर्त्यांना महिनाभराच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने या तोडफोडीचा ठपका सीपीआयएमची विद्यार्थी संघटना एसएफआयवर ठेवला. राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्लेखोरांनी हल्ला केला आणि तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस सदस्यांबरोबर झटापट केली.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी काही लोकांनी सोशल मीडियावर एसएफआयच्या हल्ल्यादरम्यान महात्मा गांधींचा फोटो तसाच असल्याचे शेअर केले होते, परंतु नंतर कार्यालयातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो फोटो जमिनीवर टाकून एसएफआयला जबाबदार धरत फोटो क्लिक केले असे आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

फडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता

दादरमध्ये ‘शिवाजी महाराजां’नी काढला ‘अफझल खाना’चा कोथळा

बालसुधारगृहात १६ वर्षांच्या मुलाची हत्या केली त्याच्यापेक्षा लहान मुलांनी

तुमच्या आशीर्वादाने फोडू महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी

 

प्रत्येक संरक्षित वनक्षेत्र आणि वन्यजीव अभयारण्याला त्याच्या हद्दीपासून एक किलोमीटरचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये असणे आवश्यक असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. या आदेशानंतर १०० पेक्षा जास्त एसएफआय कार्यकर्त्यांनी वायनाड जिल्हा मुख्यालयातील कलपेट्टा येथील राहुल गांधींच्या कार्यालयावर मोर्चा काढला. काँग्रेस खासदाराने आपल्या मतदारसंघातील लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चा पोहोचताच अनेक एसएफआय कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि कार्यालयातील उपकरणांची तोडफोड केली. त्यावेळी गांधीजींचा फोटो व्यवस्थित होता असे सीपीआयने म्हटले असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नंतर महात्मा गांधींचा फोटो खाली टाकून तो सीएफआयनेच टाकल्याची बतावणी केल्याचा आरोप आहे.

काही एसएफआय कर्मचार्‍यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले, परंतु पक्षाचे आमदार टी सिद्दीकीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस समर्थकांनी कालपेटा येथे निदर्शने केली, रात्री उशिरापर्यंत रस्ता रोखून ठेवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा