24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाहरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

दहशतवादाचा संबंध नसल्याचीही माहिती

Google News Follow

Related

रायगडमधील हरिहरेश्वर येथील समुद्रात एक अज्ञात तसेच संशयास्पद बोट आणि त्यात तीन एके ४७ रायफली आणि जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही बोट ओमानच्या नेपच्युन मेरिटाइम  सिक्युरिटीजची असल्याचे प्रथमदर्शनी समोर येते आहे. त्यांची बोट भरकटल्याची माहिती या कंपनीकडून देण्यात आली होती. त्यामुळे तूर्तास यात दहशतवादाचा संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच विधिमंडळात नेमकी माहिती स्पष्ट करणार आहेत.

ओमानच्या समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर ही बोट भरकटली होती, असे समोर येते आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) माध्यमातून पुढील तपास सुरू असून सदर कंपनी एटीएसच्या संपर्कात आहे, असेही वृत्त आहे.

रायगडमधील या प्रकारानंतर एटीएसचे पथक तिथे दाखल होणार आहे. मात्र यात दहशतवादाचा संबंध नाही, असेही म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

कसे करावे शिवलीलामृत पारायण ?

भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक

संजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?

बांगर यांचं चुकलंच; पण सत्तेचा माज जुनाच!

 

या घटनेमुळे पुन्हा एकदा २६/११च्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. मुंबईत बधवार पार्क येथून पाकिस्तानातील १० अतिरेकी मुंबईत आले होते आणि त्यांनी जवळपास ६० तास मुंबईला वेठीस धरले होते. मुंबई सीएसटी रेल्वेस्टेशनवर अनेकांचे प्राण या अतिरेक्यांनी घेतले होते तसेच ताज हॉटेल, छाबड हाऊस येथेही त्यांनी हल्ले करत निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतर या हल्ल्यात सहभागी असलेला अजमल कसाब पोलिसांच्या तावडीत सापडला होता. त्याची नंतर चौकशी केल्यावर तो पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून पाकिस्तानचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे निश्चित झाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा