26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाकाबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

काबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

Google News Follow

Related

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात २१ जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत.

बुधवार,१७ ऑगस्टला संध्याकाळच्या नमजासाठी लोक मशिदीत जमले असताना उत्तर काबूलमधील एका मशिदीत हा स्फोट झाला. हा स्फोट मशिदीच्या आत झाला. स्फोट खूप जोरदार होता. स्फोटामुळे मशिदीच्या आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात २१ जण ठार झाले असून, जवळपास ४० जण जखमी झाले आहेत. मात्र तालिबानच्या गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

काबूलमधील आपत्कालीन रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले की, २७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात सात वर्षांचा मुलगाही आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. तालिबान आपला विजय सप्ताह साजरा करत असताना हा हल्ला झाला आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला.

हे ही वाचा:

अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात एका मदरशात मौलवीचीही हत्या करण्यात आली होती. कारण तो मौलवी आयएस बद्दल अतिशय आक्रमक भाषणे देत असे. गुरुवारी मदरशात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. जिहादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी दिलेल्या माहितनुसार, मशिदीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात बरीच जीवितहानी झाली आहे, मात्र आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा