25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणरोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांना मोदींचा दणका

Google News Follow

Related

म्यानमारमधून भारतात घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांबद्दल टीका केली जात असताना आणि त्यांच्यापासून भारताच्या सुरक्षेला कसा धोका आहे, याची चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दिल्लीतील रोहिंग्यांना बक्करवाला विभागात फ्लॅट्स देण्यात आल्याची घोषणा केली. पण त्यांनी केलेल्या ट्विटनंतर काही तासांत केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना आम्ही राबविणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. हरदीप पुरी यांच्या या ट्विटवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागली जात असताना केंद्र सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे अशी कोणतीही घरे त्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हरदीप पुरी यांनी केलेल्या ट्विटबद्दल मात्र शंका कायम राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हरदीप पुरींना एकप्रकारे दणका मिळाला आहे.

जवळपास १११० रोहिंग्यांना हे फ्लॅट्स उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी यासंदर्भातील ट्विट करत ही माहिती दिली होती. हरदीप पुरी यांनी म्हटले होते की, भारतात ज्यांनी शरण घेतली आहे त्यांचे भारताने नेहमीच स्वागत केले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून रोहिंग्य शरणार्थींना दिल्लीच्या बक्करवाला विभागात ईडब्ल्यूएस फ्लॅट्समध्ये हलविण्यात येणार आहे. त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

हे ही वाचा:

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

प्रचार प्रमुखपदाच्या बेडयांतून ‘गुलाम’ झाले ‘आझाद’

 

हरदीप पुरी यांनी केलेल्या या ट्विटनंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. एकीकडे रोहिंग्यांबद्दल, घुसखोरांबद्दल केंद्र सरकारकडून वारंवार कठोर भूमिका घेतली जात असताना हरदीप पुरी यांच्या ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर केंद्र सरकारने अशी कोणतीही व्यवस्था या रोहिंग्यांसाठी केली जाणार नाही, हे स्पष्ट केले. शिवाय, रोहिंग्या हे अनधिकृतपणे भारतात प्रवेश केलेले परदेशी नागरीक आहेत, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे.

गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नव्या जागी हलविण्याची विनंती केली होती पण त्यांना तिथेच ठेवण्यात यावे असे केंद्राचे म्हणणे होते. आता परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून त्यांना अन्यत्र हलविण्याबाबत विचार केला जाईल. नियमाप्रमाणे अनधिकृत परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यात येते. पण त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची कोणतीही घोषणा दिल्ली सरकारने केलेली नाही. त्यामुळे त्यांनी रोहिंग्यांना आहेत तिथेच स्थानबद्ध करावे असे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा