25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणविरोधकांना गजनीची लागण

विरोधकांना गजनीची लागण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

Google News Follow

Related

विरोधकांना गजनीची लागण कुठेतरी झालीय.विरोधकांना आमच्यावर जास्त विश्वास आहे. आमच्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या एकजुटीची चिंता करावी, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. बुधवारपासून सुरू होत असलेल्या विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. त्या अगोदर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली.

अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमचं सरकार बेईमानी असल्याचा आरोप केला जात आहे. पण मविआ सरकारचं बेईमानीच सरकार आहे. मविआ सरकारने नऊ नऊ महिने शेतकऱ्यांना मदत केली नाही. पण आमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णंय घेतले. ९५ % पंचनामे झाले आहेत, केवळ ५% बाकी आहेत. काहींनी पंचनामे व्यवस्थित झालेले नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एनडीआरएफच्या निकषांच्या पलिकडे जाऊन दुप्पट मदत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दिली आहे. एनडीआरएफचे निकष २०१५ मध्ये बदलले. त्या निकषानुसारच मदत देण्यात येत आहे. केंद्र सरकार हे निकष बदलते व ते देशाला लागू असते. हे निकष बदलण्यासाठी केंद्र सरकार देशातल्या सगळ्या राज्यांचे मत घेत आहे. त्यानुसार निकषांबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

हे ही वाचा:

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

कोणत्याही निर्णयांना स्थगिती नाही

मविआ सरकारने घेतलल्या कोणत्याही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्याचे पुनरावलोकन करण्यात येत आहे. उलट सरकारने जेथे १०० रुपयांची तरतूद आहे तेथे ५०० रुपये वाटून टाकले आहेत. त्यामुळे त्याचं पुनरावलोकन करावे लागेल असे स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा