30 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरक्राईमनामावांद्रे येथे गोळीबार करणाऱ्याला केली अटक

वांद्रे येथे गोळीबार करणाऱ्याला केली अटक

Google News Follow

Related

मुंबईतील वांद्रे आणि खारमधील गजेबो शॉपिंग सेंटरजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना गुरुवार ११ ऑगस्टला रात्री ९ च्या सुमारास घडली. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने याप्रकरणी खार पोलीस तपास करत होते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, इतर तिघांचा शोध सुरु आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने शरीक शेखला अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. खंडणी उकळण्यासाठी आणि फेरीवाल्यांना धमकवण्यासाठी आरोपीने गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या टीमकडून आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास मुंबईतील खारच्या गजेबो शॉपिंग सेंटरवर हवेत गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने याप्रकरणी खार पोलीस अधिक चौकशी करीत आहे. दोन अज्ञात इसम गजेबो शॉपिंग सेंटरकडे मोटर सायकलवर आले होते. शॉपिंग सेंटरसमोर मोटर सायकल पार्क करून ते चालत आत शॉपिंग सेंटरमध्ये आले. शॉपिंग सेंटरसमोर आल्यानंतर हवेत आणि शॉपिंग सेंटरच्या बोर्डवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.

हे ही वाचा:

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

गोळीबार करणाऱ्या इसमांनी घटनास्थळी एक पत्रदेखील टाकल्याची माहिती मिळाली होती. त्या पत्रात असा उल्लेख होता की इथे धंदा करू नये. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ डीसीपी मंजुनाथ सिंगे, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येत पोलीस दल दाखल झाले होते. पोलिसांनी या संदर्भात परिसरातल्या सीसीटीव्ही आणि व्यापाऱ्याच्या माहिती प्रमाणे चौकशी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा