आमच्याच लोकांनी जेव्हा गद्दारी केली, दगा दिला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष परीवारासारखे पाठीशी उभे राहीले. कठीण समयी असा भक्कम पाठींबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे आभारही मानले. ठाकरे यांच्या मनात या दोन्ही पक्षांबाबत उचंबळून आलेल्या भावना खूप जुन्या नाहीत. जेमतेम महीना झाला असेल. परंतु आता हे तीन पक्ष एकमेकांच्या उरावर बसल्याचे चित्र दिसते आहे. विधान परीषदेतील विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्यानंतर हे चित्र समोर आले आहे.