शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचे आज, १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. यानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विनायक मेटे यांचा जखमी अवस्थेतला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये विनायक मेटे यांच्या डोक्याला मार लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शर्टाला तिरंगा असल्याचंही या फोटोमध्ये दिसत आहे.
विनायक मेटे हे आज मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी मुंबईला येत होते. तेव्हाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा रुग्णालयात नेतानाचा फोटो समोर आला. या फोटोत त्यांच्या शर्टावर छोटा तिरंगा लावलेला दिसत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली आहे. त्यामुळे १३ ऑगस्टपासूनच नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवला आहे. विनायक मेटे यांनीही त्यांच्या शर्टाला तिरंगा लावला होता. त्यामुळे विनायक मेटे यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात असताना त्यांच्या कपड्यावरील तिरंग्याने लक्ष वेधून घेतलं आहे.
हे ही वाचा:
“आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला”
स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीला अपघात झाला. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती अशी माहिती समोर आली आहे. यानंतर विनायक मेटे यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनायक मेटे हे अपघातात गंभीर जखमी झाले होते. मात्र, मेटे यांचे निधन झाल्याची रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.