24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषसत्ता बदलली आणि अटलजींचा पुतळा उभा राहिला

सत्ता बदलली आणि अटलजींचा पुतळा उभा राहिला

Google News Follow

Related

सत्तांतर होताच नव्या सरकारने दिली परवानगी

सत्तांतर झाल्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारमुळे कांदिवलीमध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पुतळा उभारण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी नाकारली होती. परंतु शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने हा पुतळा उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवार, १३ ऑगस्ट रोजी कांदिवलीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच या पुतळ्याचे अनावरण होत आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा हा पूर्णाकृती पुतळा गेल्या वर्षी म्हणजे अटलजींच्या २५ डिसेंबर २०२१ च्या जयंती दिनीच उभारण्याची सर्व तयारी झालेली होती. या अनावरणासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. भाजपचे खासदार यांनी हा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. परंतु तत्कालिन मविआ सरकारमधील क्रिडा राज्यमंत्री सुनिल केदार यांनी ऐनवेळेला म्हणजे आदल्या दिवशी परवानगी नाकारली. त्यामुळे गेल्या दिड वर्षांपासून हा पुतळा कांदिवलीच्या एका खासगी जागेत अनावणाच्या प्रतिक्षेत होता. परंतु आता नव्या सरकारच्या परवानगीमुळे या पुतळ्याचे अखेर अनावरण होणार आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

१२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा
कांदिवली पूर्वमधील समतानगर भागात अटलबिहारी सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. या ठिकाणीच हा १२ फूट उंचीचा पूर्णकृती पुतळा बसवण्याचे निश्चित करण्यात आले होते. आता १३ ऑगस्टला दुपारी भाजपचे हजारो कार्यकर्ते मिरवणूक काढून हा पुतळा सध्याच्या जागेतून अटलबिहारी सेंटर ऑफ एक्सलन्स येथे नेणार आहेत. त्यानंतर येथे अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा