26 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरराजकारण'उजवी'कडे झुकतेय काँग्रेस, सपाची तरुणाई ?

‘उजवी’कडे झुकतेय काँग्रेस, सपाची तरुणाई ?

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांचे मित्र पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि भाजपाच्या राष्ट्रवादी एजेण्ड्यावर अनर्गल टीका करत असताना सर्वपक्षीय तरुणाई मात्र नेतृत्वाला फार किंमत न देता उजव्या बाजूला झुकत असल्याचे चित्र आहे.

मध्य प्रदेशमधील दमदार युवा नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाची वाट धरून आता काळ लोटला. अलिकडे लोकसभेत त्यांनी शेतकरी कायद्यांचे जोरदार समर्थन करताना काँग्रेस आणि शरद पवारांवर तिखट टीका केली. सचिन पायलट भाजपामध्ये येता येता राहीले. परंतु ते कधीही दाखल होऊ शकतात अशी शक्यता आहे.

काँग्रेस आणि अन्य पक्षातील युवा नेत्यांची गेल्या काही दिवसातील कृती आणि उक्ती पाहीली तर प्रसंगी पक्ष नेतृत्वाला दुखावून तरुण नेते राष्ट्रवादाचा एजेण्डा स्वीकारत आहेत.

अखिलेश यादव यांनी राममंदीरासाठी वर्गणी गोळा करणा-यांचा ‘चंदाजीवी’ असा उपहास केला असला तरी मुलायम सिंह यांच्या धाकट्या सुनबाई अपर्णा यादव यांनी ‘राम मंदीर हे राष्ट्र कार्य आहे आणि भावी पिढ्या रामभक्त झाल्या पाहीजेत’, अशी रोखठोक भूमिका मांडून अखिलेशना चपराक दिली.

हे ही वाचा:

राहुल यांचे ‘राळ’ तंत्र

रायबरेलीतून काँग्रेसच्या आमदार असलेल्या अदीती सिंह यांनी देखील राममंदीरासाठी देणगी देऊन अनेकांना चकीत केले होते. रायबरेली हा अनेक दशके काँग्रेसचा मजबूत गड राहीला आहे.

राममंदीर हा सर्व हिंदूच्या आस्थेचा विषय असला तरी भाजपा व्यतिरीक्त अद्यापि एकाही राजकीय पक्षाने राम मंदीर उभारणीसाठी निधी गोळा केल्याचे उदाहरण नाही.

मिलिंद देवरा यांनी मेट्रो मॅन ई.श्रीधरन यांच्या भाजपा प्रवेशाचे समर्थन करताना केलेल्या ट्वीटमध्ये ‘राजकारणात ई. श्रीधरन यांचे स्वागत करण्यासाठी भाजपाचा असण्याची गरज नाही, राजकारणात आम्हाला अशी भरपूर माणसं हवी आहेत’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मिलिंद देवरा हे अडगळीत पडले असून यापूर्वी अनेकदा त्यांनी ट्वीटर अशी बेधडक भूमिका घेतली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राममंदीर बांधून कोरोना जाणार काय’, अशी नकारात्मक भूमिका राष्ट्रवादी घेतली असताना त्यांचे पार्थ अजित पवार यांनी मात्र पत्र लिहून राममंदीरासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पार्थ पवारांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

राज्यसभेत निवृत्त होताना विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींच्या काश्मीर धोरणावर केलेली कौतूकाची उधळण तर चर्चेचा विषय बनली होती. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी अनेकदा पक्षनेतृत्वाची तमा न बाळगता मोदींच्या कामाची तारीफ केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा