अमरावती येथील उमेश कोल्हे यांनी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. शेख शकील शेख छोटू (वय २८) असे या आरोपीचे नाव आहे.
अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्यामुळे त्यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात NIA कडून काल दहाव्या आरोपीला म्हणजेच शेख शकील शेख छोटू याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी शहरातील लालखडी परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान NIA कडून आठ दिवसांपूर्वी उमेश कोल्हे यांची हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. तसेच कालसुद्धा पोलिसांनी एकाला अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता दहा झाली आहे. शेख शकील शेख छोटू हा इतर आरोपींसोबत उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे NIA कडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच
कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या
‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’
एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपवर पोस्ट शेअर केली होती. उमेश कोल्हे हे रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना, नुपूर शर्मा यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून त्यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. हल्ला झाल्यानंतर कोल्हे यांना रुग्णालयात नेण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.