भारताीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त भारतभर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे आयोजित केले जात आहेत. तसेच ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ह्या उपक्रमांतर्गत भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये ‘घरो घरी तिरंगा’ ही मोहीम राबवण्यासाठी केंद्राने सूचना केल्या आहेत. यासाठीच मुंबई महानगर पालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगे वाटण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी राष्ट्रीय ध्वजाबरोबर काठ्यांची सुद्धा मागणी केली आहे. मुंबई महानगर पालिकेने मात्र ध्वजाबरोबर काठी देणं शक्य नसल्याचे सांगितले. लोकसहभागातून काठ्यांचा पुरवठा करावा किंवा लोकांनी किमान काठीची सोय करावी, अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहेत. तसेच मुंबईत या अभियानाची अंमलबजावणी मुंबई महानगर पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. मुंबईत ५० लाख ध्वज उभारले जातील, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे ३५ लाख राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण केले आहेत. तसेच ५० लाख ध्वज विविध आस्थापना आणि व्यावसायिक इमारती असे सर्व मिळून लावणार आहेत.
हे ही वाचा:
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
यंदा टपाल विभागात राख्यांसाठी २० हजार लिफाफे गेले घरोघरी
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
कोणत्या रागातून पत्नीने केले पतीच्या शरीराचे तुकडे?
११ ऑगस्ट पर्यंत पालिकेतर्फे घरोघरी तिरंगा वाटप करण्यात येणार असून, पालिकेकडून विशेषतः झोपडपट्टी परिसरात तसेच रहिवाशांमध्ये ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहेत. या ध्वजाबरोबर नागरिकांनी काठ्यांची मागणी केली. मात्र काठ्या पुरवणे शक्य नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी सांगितले. तसेच या अभियानासाठी अनेक संस्था मदतीकरिता पुढे येत आहेत. व काही संस्थानी आर्थिक मदत व ध्वज वाटप सुद्धा केले आहेत. त्याचबरोबर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ध्वजसंहिता शिथिल करण्यात आली आहे. नागरिकांच्या मनात ध्वजाबद्दल भीतीची भावना निर्माण होऊ नये तर आदराची भावना हवी, असे मतही शर्मा यांनी व्यक्त केले आहे.