24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामामाेहर्रमचे ताजिया वीजेच्या तारांना चिकटले आणि

माेहर्रमचे ताजिया वीजेच्या तारांना चिकटले आणि

Google News Follow

Related

माेहर्रमच्या मिरवणुकीत लखनऊमध्ये विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबराेबर निम्म्याहून अधिक ठिकाणी ताजियाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ६८ पेक्षा जास्त लाेक भाजले आहेत. यामध्ये सर्वात जास्त तीन जणांचा मृत्यू बलियामध्ये झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत बलिया, मुरादाबाद आणि अमराेहा येथे उंच ताजिये लटकत असलेल्या विजेच्या तारांना चिकटले. त्यामुळ या ताजियांमध्ये विद्युत प्रवाह येऊन ठिणग्यांमुळे आग भडकण्याची घटना घडली आहे.

बलियामधील सिकंदरपूर येथे ताजिया दफन करून शुक्रवारी रात्री दाेन वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमधून घरी जात असताना ताजियामध्ये लावलेली लाेखंडी छत्री वीज प्रवाहाच्या संपर्कात आ ल्यामुळे जिंदापूर येथे राहणारे समी खाॅं (२२) सलीम खाॅं(१८) आणि उमरान (१८) यांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ही वाचा:

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

 

अन्य एका घटनेत डिडाैली पाेालिस ठाण्याच्या क्षेत्रातील कनकपुरा गावातील कर्बला येथे जात असताना २५ फूट उंच ताजिया विजेच्या तारेला चिकटला त्यामुळे असगरी गावातील १६ लाेक भाजले. त्यांना असगरी गावातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे . लालगाेपालगंजमध्ये देखील वीजेच्या तारांना ताजिया चिकटल्यामुळे विजेचा धक्का लागून ताजिया पकडणारे सहा जण भाजले हंडियाच्या पहाडपूर गावातही ताजियाचा विजेच्या तारेला धक्का लागून तीन जण भाजले.

मुरादाबादमध्ये ३५ जण भाजले

मुरादाबादच्या जयंतीपूर गावात लाेक ताजिया घेऊन कर्बला येथे जात हाेते. ते जात असलेल्या रस्त्यावर विजेच्या तारा हाेत्या. १६ फूट उंच ताजियावर लाऊडस्पीकर ठेवला हाेता. या विजेच्या तारेच्या संपर्कात लाऊडस्पीकर आला आणि ठिणग्या उडाल्या. या दुर्घटनेत जवळपास ५० लाेक भाजले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा