राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांचे राजकारणातील चांगले दिवस सरले आहेत, असे चित्र आता दिसू लागले आहे. सत्ता गमावली, सत्तेवर असताना केलेल्या पापांची भूतं आता कबर फाडून बाहेर येतायत. ही पापं फक्त गेल्या अडीच वर्षांच्या काळातील नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारुढ होते तेव्हाची आहेत.