27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाडोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याची माहिती दिली असून एफबीआयने ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानावर छापा टाकला आहे.

Google News Follow

Related

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी एफबीआयने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याची माहिती दिली आहे. एफबीआयने ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानावर छापा टाकला आहे.

ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया अ‍ॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर यासंबंधी माहिती दिली आहे. एफबीआय अधिकाऱ्यांनी पाम बीचवर असलेल्या ‘मार-ए-लागो’वर छापा टाकल्याची माहिती आहे. दरम्यान, २०२० साली ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्म्प यांनी अनेक सरकारी कागदपत्र सोबत नेले होते. ही कागदपत्रं फ्लोरिडामधील त्यांच्या ‘मार-ए-लागो’ येथून हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा येथे छापेमारी करण्यात येत आहे. एफबीआयने छापा टाकला तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.

‘अमेरिकेसाठी हा काळा दिवस असून लोकशाहीवरचा हल्ला आहे. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत असून मी २०२४ मध्ये निवडणुकीसाठी उभं राहू नये म्हणून ही विरोधकांची खेळी आहे,’ असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला

धनखड कणखर हिंदुत्ववादी

टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात न्याय विभाग दोन प्रकरणांची चौकशी करत असून पहिले प्रकरण हे २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल बदलण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. तर दुसरे प्रकरण हे कागदपत्रे हाताळण्यासंदर्भात आहे. याबाबत व्हाईट हाऊस, न्याय विभाग यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा