27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाटीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग

टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग

Google News Follow

Related

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभागाची परीक्षा आणि म्हाडाच्या परीक्षेशी संबंधित घोटाळ्यांची माहिती पुणे पोलिसांकडे रविवारी, मागितली होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने टीईटी घोटाळ्याप्रकरणी कागदपत्रे मागवली होती ज्याचा तपास सायबर पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेने केला होता.

कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थाना टीईटी घोटाळ्याची कागदपत्रे मागवली होती आणि आता चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळाल्याच्या एका दिवसानंतर, ईडीने टीईटी घोटाळ्यात मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत या घोटाळ्या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये घोटाळा उघडकीस

हजारो परिक्षार्थी उमेदवारांना त्यांचे गुण वाढवून देण्यात आले तर काहींना रोख रकमेच्या बदल्यात बनावट प्रमाणपत्र दिल्याचे हे प्रकरण डिसेंबर २०२१ मध्ये उघडकीला आला. गेल्या आठवड्यात परिक्षा परिषदेने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या ७,८०० उमेदवारांची यादी जाहीर केली. यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांवर टीईटी परीक्षा देण्यासाठी कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

अब्दूल सत्तार अडचणीत येणार

टीईटी घोटाळ्यामध्ये दोषी ठरलेल्या ठरलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परिक्षेत गैरव्यवहार करताना आढळून आलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे. दरम्यान हिना कौसर अब्दूल सत्तार शेख आणि उझमा नाहीत अब्दूल सत्तार शेख या दोन परिक्षाथींची नावेही या प्रकरणात घेतली जात आहेत. सिल्लोडचे आमदार व माजी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या या दोन मुली असल्याचे म्हटले जात आहे. आमदार सत्तार यांनी मात्र याचा इन्कार करताना आपल्या मुली 2020 मध्ये टीईटीमध्ये नापास झाल्या होत्या. या प्रकरणात आपल्या कुटुंबाला ओढण्याची ही विरोधकांची चाल असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा