28 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरराजकारणअमृता फडणवीस यांना 'त्या' गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीका नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली होती. ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले होते.

झी मराठी या टीव्ही चॅनलवर बस बाई बस या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी यावेळी ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते असा प्रश्न अमृता यांना विचारला. यावेळी त्या म्हणाल्या, मी उद्धव ठाकरे यांचा खूप सन्मान करते पण हे गाणं ऐकून मला उद्धव ठाकरे यांची आठवण येते. हे उत्तर ऐकून उपस्थित असलेले प्रेक्षकही हसू लागले. विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली होती. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी उठाव केला. त्यामुळे महाविकास आघाडी खिळखळी झाली. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मविआ सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांच्यावर ही जी परिस्थिती ओढवली त्यावरून अमृता यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली होती.

हे ही वाचा:

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

दरम्यान, यावेळी सुबोध भावे यांनी अमृता यांना देवेंद्र फडणवीस यांना काय संदेश द्याल हे विचारले होते. त्यावेळी त्या म्हणाले, व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबासाठीही वेळ द्या. तसेच तुम्ही जे काम करता त्याचा मला अभिमान आहे, असंही अमृता म्हणाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे कौतुक सुद्धा केले होते. त्या ज्या पद्धतीने घर सांभाळतात याचे मला कौतुक आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा