शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. परंतु, शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामनाच्या अग्रलेखात आजचा रोकठोक लेख संजय राऊत यांच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. कोठडीत असताना त्यांचा लेख आल्याने तो लिहला कसा आणि कधी, असे राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल ट्विटरवरून संदीप यांनी केला आहे.
आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 7, 2022
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केले. गेल्या आठवडाभरापासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. कालच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने नऊ तास चौकशी केली. अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी वर्षा राऊत यांच्या खात्यावर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजवाले होते.
हे ही वाचा:
म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे
सुवर्णपदक हुकणाऱ्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन
नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?
एकीकडे संजय राऊत ईडीच्या कोठडीत असताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सामनाच्या मुख्य संपादकपदाचा भार स्वीकारला. तर संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक अजूनही आहेत. संजय राऊत यांचे यापूर्वी रोखठोक मधून अग्रलेख प्रसिद्ध होत असत. मात्र, ईडीच्या कोठडीत असताना आज, ७ ऑगस्ट रोजी त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोठडीत संजय राऊत यांनी अग्रलेख लिहला का? की त्यांच्या नावाने इतर कोणी लेख प्रसिद्ध केला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत चर्चांना उधाण आले आहे.