२५ वर्षीय कुस्तीपटू पूजा गेहलोतने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफॅकचा १२-२ असा पराभव केला. परंतु सुवर्णपदक न मिळाल्याने पूजाने देशाची माफी मागितली असता पंतप्रधान मोदींनी तिचे कौतुक करत तिला प्रोत्साहन दिले आहे.
महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो गटात पूजाने कांस्यपदक जिंकले असून, राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे पहिलेच पदक आहे. पण सुवर्णपदक मिळावे यासाठी लढणाऱ्या पूजाला जेव्हा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले तेव्हा तिला अत्यंत दुःख झाले. ती म्हणाली, उपांत्य फेरीत जेव्हा मी हरले तेव्हा मला खूप दुःख झालं. यासाठी मी देशाची माफी मागते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीचं खेळाडूंना आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात.
Yesterday, the National Committee on Azadi Ka Amrit Mahotsav met. Heard the insightful inputs of fellow members of this Committee. I emphasised on ways to strengthen the spirit of Jan Bhagidari and the need of fulfilling the vision of our freedom fighters. https://t.co/UGYdDOayhS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2022
देशाची माफी मागणाऱ्या पूजाला पंतप्रधान मोदी प्रोत्साहित करत म्हणाले, पूजा, तुझे पदक आनंद साजरा करण्याचे असून त्यासाठी माफी मागायची नाही. तुमचा जीवन प्रवास आम्हाला प्रेरणा देतो, तुमचे यश आम्हाला आनंदित करते. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकणाऱ्या सर्वच खेळाडूंचे ट्विटरवर कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?
आणि अविनाश साबळेने जिंकले राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील स्टीपलचेसचे पहिले पदक
ममता बॅनर्जींचा आदेश दोन खासदारांनी धुडकावला!
दरम्यान, भारताच्या कुस्तीपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत बारा पदके मिळवली आहे. सहा सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कास्य अशी एकूण बारा पदके कुस्तीपटूंनी पटकावली आहेत. तर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ४० पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्यपदके आहेत.