नितेश राणे यांनी दिला इशारा
अमरावतीत उमेश कोल्हे यांची झालेली हत्या आणि आजा कर्जतमध्ये नुपूर शर्मा प्रकरणातून प्रतीक पवार या तरुणाच्या हत्येचा झालेला प्रयत्न हे प्रकार सहन करण्यापलीकडचे आहेत. जर हे थांबले नाही तर आम्हा हिंदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल, असा इशारा भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अहमदनगर येथील कर्जत तालुक्यात ४ ऑगस्टला प्रतीक पवार हा तरुण अण्णाभाऊ जयंतीच्या निमित्ताने जात असताना १०-१५ मुस्लिम युवकांनी थांबवून नुपूर शर्माचा डीपी ठेवतो म्हणून त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात धारदार हत्यारे होती. तो युवक बेशुद्ध झाला. पण त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तो मृत्यूशी झुंज देत आहे, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
नितेश राणे म्हणाले की, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आमचेही हात बांधलेले नाहीत. हा संदेश आम्हाला द्यायचा आहे. सगळ्या हिंदू संघटना तिथे एकत्र आल्या. मग संबंधितांवर एफआयआर केला गेला. संबंधित आरोपींना लवकर अटक करण्याची मागणीही राणे यांनी केली. जोपर्यंत त्यांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
हे ही वाचा:
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
भुजबळ, आव्हाड यांना अजूनही बंगले सोडवेनात
शेतकऱ्यांना नवी दृष्टी देणारे ‘भागीरथ’ प्रयत्न
आता हे काय महाविकास आघाडीचे सरकार नाही. कुठल्याही हिंदूंना टार्गेट केले गेले तर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते हा संदेश मला द्यायचा आहे. आमच्या देशात शरिया कायदा लागू नाही. तुम्ही देवीदेवतांवर कुणी काही बोलल्यावर विसरायला तयार नसाल आणि त्या बाजूने सातत्याने हिंदु देवीदेवतांची विटंबना होत असेल, सोशल मीडियावर अपमान होत असेल तर आम्ही सहन करणार नाही.
नितेश राणे म्हणाले की, नाशिकमध्ये शिवलिंगाची विटंबना करण्यात आली होती. पण आम्ही त्यावर लोकशाही पद्धतीने आवाज उठवतो. कुणाला मारून टाकण्याचा प्रकार होत नाही. तुम्ही विसरायला तयार नसाल तर आम्ही का विसरावे? आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल. शरिया कायदा राबवत अशाल तर मला गीतेचे सार समजावून सांगावे लागेल. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण देशाच्या रक्षणासाठी जे करायला लागेल ते आम्ही करू, हाच संदेश द्यायचा आहे.