पलक्कड महापालिकेतील पराभव कम्युनिस्टांना फारच जिव्हारी लागला. पराभवाने बिथरलेल्या कम्युनिस्ट गुंडानी जिल्ह्यात हिंसाचार सुरु केला. कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या सुब्रमण्यम मंदिराची तोडफोड केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ११ जणांना अटक करून गुन्हा नोंदवला आहे.
केरळमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्याच भाजपला काही प्रमाणात यश मिळाल्यामुळे कम्युनिस्टांचा पारा चढला. राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. कासारगोड, अप्पट्टी, पुथियाकोट्टा, अराई कार्थिका, आणि अराई पलक्काल या ठिकाणची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची कार्यालये फोडण्यात आली. भाजप नेते उमानाथ राव यांच्या मुलीच्या घरावर पण दगडफेक करण्यात आली. एकूणच या सर्व प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा संघ-भाजपकडून वर्तवली जात आहे.