25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाऑरगॅनिक केमिस्ट्रीत शिक्षण घेतलेल्याकडे सापडले १४०३ कोटींचे अमली पदार्थ

ऑरगॅनिक केमिस्ट्रीत शिक्षण घेतलेल्याकडे सापडले १४०३ कोटींचे अमली पदार्थ

मेफेड्रॉन विकणारी मोठी टोळी केली उद्ध्वस्त

Google News Follow

Related

अमली पदार्थ विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने एकूण ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा व १४०३ कोटी ४८ लाख रुपयांचे एमडी म्हणजे मेफेड्रॉन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या माध्यमातून मुंबई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची अवैध वाहतूक व व्यापार करणारी मोठी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे. एकूण १४०७ कोटींचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.

शिवाजीनगर गोवंडी येथे एका आरोपीला २५० ग्रॅम मेफेड्रॉनसह पकडण्यात आले. त्याची किंमत ३७ लाख ५० हजार इतकी आहे. त्याला आरोपी क्रमांक २ ने या अमली पदार्थाचा पुरवठा केला होता. दुसऱ्या आरोपीकडून २ किलो ७६० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. २७ जुलैला एका महिला आरोपीला अटक करण्यात आळी तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २ ऑगस्टला आरोपी क्रमांक ४ ला पकडण्यात आले.

त्याची चौकशी केल्यावर आरोपी क्रमांक ५ कडून अमली पदार्थ खरेदी करून ते आरोपी क्रमांक ३ व २ यांना देत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी क्रमांक ५ हा ऑरगॅनिक केमिस्ट्रीत शिक्षण घेतलेला असून वेगवेगळी रसायने एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एमडी मेफेड्रॉन हा पदार्थ त्याने बनविला. वेगवेगळ्या सोशल मीडियावर ओळख बदलून तो अमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचेही निष्पन्न झाले.

आरोपी क्रमांक ५ कडून ७०१ किलो ७४० ग्रॅम मेफेड्रॉन हे १४०३ कोटी ४८ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

एक तैवान, दोन पैलवान

राहुल गांधी, राऊतांच्या मार्गावर…

 

अशाप्रकारे आरोपी १ कडून २५० ग्रॅम मेफेड्रॉनसदृश अमली पदार्थ (किंमत ३७ लाख ५० हजार रु.), आरोपी क्र. २ कडून २ किलो ७६० ग्रॅम मेफेड्रॉन (४ लाख १४ हजार रु.), आरोपी ५ कडून ७०१ किलो ७४० ग्रॅम (१४०३ कोटी ४८ लाख रु.) असे एकूण १४०७ कोटी ९९ लाख ५० हजार ९०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यासोबत या पदार्थांचा व्यापार करणारे मोठे रॅकेटही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अमलीपदार्थमुक्त समाज घडविण्याचे काम बृहन्मुंबई शहर पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा