नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) यांच्या किमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय मुंबईत पीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. त्याची किंमत प्रति युनिट चार रुपयांनी वाढली आहे.
या दरवाढीनंतर आता मुंबईत सीएनजीची किंमत वाढून प्रती किलोग्रॅम ८६ रुपये झाली आहे तर स्थानिक पीएनजीची किंमत ४ रुपयांनी वाढून प्रती युनिट ५२.५० रुपये झालेली आहे. केंद्राने १ एप्रिलपासून देशांतर्गत आणि आयातित नैसर्गिक वायूच्या किमतीत ११० टक्क्यांहून अधिक वाढ केली होती.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!
पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….
८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर
एप्रिलनतर सहाव्यांदा वाढ
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींमध्ये या वर्षाच्या एप्रिल महिन्यानंतर सहाव्यांदा वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने गेल्या १२ जुलै रोजी किंमतीत वाढ केली होती. त्यावेळी सीएनजीच्या किंमतीत प्रती किलोग्रॅम ६ रुपये आणि पीएनजीच्या किंमतीत ३ रुपयांनी वाढ झाली आहे.
या कारणामुळे वाढल्या किंमती
महानगर गॅस लिमिटेडच्या म्हणण्यानुसार गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने हा खर्च भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये १८% वाढ जाहीर केली आहे. या घोषणेनंतर देशातील शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढू लागल्या आहेत.