पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची कोट्यवधींची मालमत्ता सीबीआयने जप्त केली आहे. दोघांची मिळून ४१५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. येस बँक घोटाळ्यात आतापर्यंत १ हजार ८२७ कोटी मालमत्ता जप्त केली गेली आहे.
ED has provisionally attached assets worth Rs. 251 Crore of Sanjay Chhabria and assets worth Rs 164 Crore of Avinash Bhosale, (total asset worth of Rs. 415 crore) in Yes Bank- DHFL Fraud case under PMLA, 2002. Total attachment in the case stands at Rs. 1827 Crore.
— ED (@dir_ed) August 3, 2022
‘अविनाश भोसले यांची १६४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर संजय छाब्रिया यांची २५१ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. अविनाश भोसले यांचा मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट जप्त केला गेला आहे. तर छाब्रिया यांची बंगळुरू आणि सांताक्रुझमधील जमीन, सांताक्रुझ तीन कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून आर्थिक अफरातफर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच सीबीआयने अविनाश भोसले यांच्याकडील ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सीबीआयने जप्त केले होते. पुणे येथील भोसले यांच्या घरातून हे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!
पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….
डीएचएफएलचे पूर्वीचे प्रवर्तक कपिल आणि धीरज यांच्यावर ३४ हजार कोटींहून अधिक रकमेच्या १७ बँकांच्या कन्सोर्टियमची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वाधवान बंधू तुरुंगात असून सीबीआय या प्रकरणात भोसले यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे. यापूर्वी सीबीआयने भोसले यांना येस बँक- डीएचएफएल कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित आणखी एका फसवणू करणात अटक केली होती.