महिला शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना विचारला सवाल
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी ४० आमदारांसह वेगळी वाट स्वीकारल्यानंतर अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला आणखी एक कारण ठरले आहे ते सुषमा अंधारे यांचा शिवसेनेतील प्रवेश. संध्या वढावकर या महिला शिवसैनिक अंधारे यांच्या प्रवेशामुळे वैतागल्या आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यांच्या या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच अंधारेंनी अनेकवेळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच हिंदू देवीदेवता, हिंदुत्व यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. संध्या वढावकर या कार्यकर्त्याही त्यामुळे चिडल्या. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, माझी पक्षात प्रचंड घुसमट झाली. मी बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ होते. ३७ वर्षे पक्षाचे काम केले. मुलं लहान होती. मुलगा ऋषिकेश वढावकर तो अडीच वर्षांचा होता. मुलगी ८ वर्षांची होती. त्या मुलांना टाकून मी पक्षासाठी राबले. हिंदुत्वाच्या विचाराने भारले होते. म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. पण आता परिस्थिती बदलली. आता अंधारे बाई पक्षात आल्यात. जिने आपल्या हिंदू देवीदेवतांची विटंबना केली. शिवसेनाप्रमुखांना शिवीगाळ केली. तिला उपनेतेपद दिलेत. जी ३७ वर्षे तन मन धनाने काम करते तिला काहीही नाही. मला याचा राग आला. दुःख झालं. म्हणून मी रागाने मी एकनाथ शिंदेंकडे आले.
हे ही वाचा:
राऊत यांच्या अटकेबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या चालकाने वाटले पेढे!
टिळकांचे शेवटचे छायाचित्र बाबुराव घारपुरे यांच्या कॅमेऱ्यात कैद…
जुलैमध्ये १.४० लाख काेटींचे विक्रमी जीएसटी संकलन
५जी लिलावात रिलायन्स जिओची बाजी, लावली तब्बल ८८,००० कोटींची बोली
वढावकर म्हणाल्या की, मातोश्रीवरून फोन केल्यावर कधी प्रतिसाद मिळाला नाही. परवा मी उद्धव ठाकरेंकडे गेले होते. तेव्हा अंधारे यांच्याबद्दल त्यांना सांगितले. पण आता जोमाने काम करयाचे आहे. हिंदुत्व आम्ही खांद्यावर घेतले आहे. राजन विचारे साहेबांचे प्रचारांचे काम केले. एवढं काम करत असतानाही लक्ष दिलं नाही तर खंत वाटते. काम करायची जिद्द आहे जोम आहे.